Breaking News

कुख्यात नक्षलवादी बिंदूसह 5 अटकेत

रांची : पोलिसांनी हाती घेतलेल्या नक्षलवादी विरोधी कारवाईला मोठे यश मिळाले आहे. एनआयए आणि रांची पोलिसांनी मोठी कारवाई करत टीपीसी नक्षलवादी संघटनेचा मुख्य नक्षलवादी बिंदू गंझू याच्यासह 5 साथीदारांसह अटक केले . चंद्र तांडव कोळसा प्रकल्पातील लेव्ही वसुलीच्या प्रकरणात तो आरोपी होता.
शुक्रवारी रात्री एनआयएच्या टीमने गुप्त पद्धतीने कांके रोडवरील हॉट लिप्स या हॉटेलवर छापा टाकला. ज्यामध्ये पोलिसांने बिंदूसह त्याच्या 5 साथीदारांनाही अटक केली. या छाप्याच्या वेळी रांची पोलिसांचे अनेक अधिकारी उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार एनआइएने शहरातील अन्य दोन ठिकाणांवरही छापे टाकले होते. मात्र याबद्दलची माहिती एनआइएने अद्यापही उघड केली नाही. राज्यात लेवी आणि रंगदारीतून कमवलेल्या नक्षलवाद्यांच्या संपत्तीची चौकशी रांची पोलीस करीत आहेत. यामध्येच चतराच्या बिंदू गंझूचा ही समावेश आहे . 2015 साली बिंदेश्‍वर गंझू आणि त्याच्या पत्नीच्या खात्यात 4.32 कोटी रुपये मिळाले होते. पोलिसांना ही माहिती टंडवा ठाण्यात दर्ज केलेल्या 169 /2015 च्या चौकशी दरम्यान मिळाली होती.