Breaking News

कैफची'इंनिंग ओव्हर' क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारताचा एकेकाळचा हक्काचा बॅट्समन व चपळ क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ याने काल स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल १२ वर्षांपूर्वी कैफ शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळाला होता. त्यानंतर इतक्या वर्षांनी त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.

मोहम्मद कैफने भारताकडून १३ कसोटी, १२५ वनडे सामने खेळले आहेत. २००२ साली झालेल्या नेटवेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये कैफने लॉर्ड्सच्या मैदानावर ८७ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता. हा सामना १३ जुलै रोजी खेळला होता तर १३ जुलै रोजीच मोहम्मद कैफने निवृत्तीची घोषणा केली हे विशेष.

कैफने बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी के खन्ना आणि कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांना पाठवलेल्या इ मेलमध्ये म्हटले आहे की मी सर्व प्रकारच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधून आणि स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. इंग्लंडमधील त्या नॅटवेस्ट मालिका विजयाला आज १६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच दिवसाचे औचित्य साधत मी निवृत्तीचा निर्णय घेत आहे. राष्ट्रीय संघाकडून खेळता आले हे मी माझे भाग्य समजतो आणि ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट होती. १२५ एकदिवसीय आणि १३ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना मला फार अभिमान वाटला.