Breaking News

स्थलांतरामुळे सातारा शहरात बैलं झाली मातीची !

ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित झालेली मंडळी ख-याखु-या बैलांऐवजी मातीच्या मूर्ती पूजण्यात धन्य मानू लागली आहेत. यामुळे शहरात या बेंदुराच्या पार्श्वभूमीवर मातीच्या मूर्तींची मागणी वाढत चालल्याची माहिती शहरातील कुंभार वर्गाने दिली. दरम्यान, पावसाळरणात बैल वाळण्याला अधिक कालावधी लागत असल्याने कुंभार वर्ग मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच बैल बनविण्यास सुरुवात करत असल्याने यंदाही बाजारात वेळेत मातीची बैले उपलब्ध होणार असल्याचे कुंभार वर्गातून सांगण्यात आले आहे. पुढील महिन्यात बळीराजाचा जिव्हाळ्याचा सण म्हणजे बेंदूर. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ग्रामीण भागात व शहरी भागात हा सण साजरा केला जातो. ग्रामीण भागात शेतकरी बैलांची पूजा करतात. तर शहरी भागात सहसा बैल पाहायला मिळत नसल्याने शाडू मातीच्या बैल जोडीची पूजा करतात.सध्या शहरामध्ये बैलाचे रंगकाम कुंभारवाड्यामध्ये सुरु करण्यात आले आहे. बैलांवर शेवटचा रंगाचा हात मारण्यामध्ये कुंभारदादा मग्न झाले आहेत.