नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
अकोले तालुक्यातील मेहेंदुरी गावात वाघोबा युवा प्रतिष्ठानच्या वतीने नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, शकुंतला महिला बहुद्देशीय सेवा या संस्थेच्या माध्यमातून, मेहेंदुरीमध्ये मंगळवार दि. 17 रोजी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या बरोबरच नेत्रसंबंधी योग्य मार्गदर्शन करणार असून, योग्य दारात चष्मेही देण्यात येणार आहेत. मेहेंदुरी परिसरातील व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी तपासणी शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन मेहेंदुरी ग्रा. पं. सदस्य डॉ. अविनाश कानवडे यांनी केले. या शिबिराबरोबरच नेत्राची काळजी समस्यांचे योग्य मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती कुलकर्णी मेमोरियल आय केअर सेंटर सातारा चे डॉक्टर भालेराव यांनी दिली.