Breaking News

सत्कारासाठी चिमुकल्यांचे केले हाल! हिरडगाव शाळेचा प्रताप

श्रीगोंदा प्रतिनिधी

तालुक्यातील हिरडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अयोग्य व्यवस्थापनामुळे लक्तरे वेशीला टांगली जात आहेत. आढळगाव आणि पेडगाव या दोन केंद्रातील बदल्या झालेल्या शिक्षकांचे सत्कार ठेवण्यात आले होते. हा कार्यक्रम शाळा सुरु असतानासुद्धा सुमारे पाच तास चालला. या सत्कार समारंभासाठी विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले.

शाळेच्या व्यवस्थापन कमिटीमध्ये पालकांना विचारात न घेता कमिटी निवडण्यात आली. विशेष म्हणजे ज्यांचे विद्यार्थी श्रीगोंदा शहरात शिकत आहेत, त्यांची हुजरेगिरी या सत्कार समारंभात दिसून आली. सध्या हिरडगाव शाळेमध्ये जुन्या स्टेजला नवीन सजावट सुरू आहे. या कामाचे नियंत्रणसुद्धा माजी सरपंच करत असल्याचे दिसत आहे. सुरू असलेल्या मंचावर जि. प. च्या लहान बाळ गोपालांनी सांस्कृतिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेऊन गावकऱ्यांची मने जिंकत पैसे गोळा केले. या मंचाच्या नावाखाली विस्तार अधिकारी सुरेश ढवळे याच शाळेत शिकल्यामुळे मोठे योगदान देत शाळेचा विस्तार करण्यास सुरुवात केली. परंतु शाळेच्या अशा प्रतिमा डोळ्यासमोर येऊ लागल्यामुळे पालकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दरम्यान, ग्रामसभा बोलावून शाळेच्या व्यवस्थापन कमिटीची फेरनिवड करावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत. सर्वच शिक्षक बदलल्यामुळे नवीन शिक्षकांना अंधारात ठेवण्यात आले आहे. आपली मुले श्रीगोंद्यात पाठवून गावात चोरटा कारभार करणाऱ्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी सर्वांकडून अपेक्षा करण्यात येत आहे.

चौकट

तर आंदोलन करू 

गोरगरीबांची मुले नाचवून पैसा गोळा करुन आपली खळगी भरणे थांबवा. तुमची मोठ्या शाळेत आणि आमची काय तमाशगीर करायची का? शाळेचा कारभार सुधारला नाही तर शाळेला कूलूप ठोक आंदोलन करु. 

बाळासाहेब दरेकर, पालक.