Breaking News

६ हजार कांदा गोण्याची आवक

कोपरगाव शहर प्रतिनिधी: 

बाजार समितीत शनिवारी ६ हजार ४५७ कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला १ हजार ७०० रुपये भाव मिळाला. तसेच ४० गोणीला प्रती क्विंटल १ हजार ८०० इतका उच्चांकी भाव मिळाला. कोपरगावात कांदा बाजार समितीमधे भाव वाढत आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले व संचालक मंडळानी दिली.

शेतकरी बांधवानी आपला कांदा दर मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस कांदा लिलाव होत आहे. एक दिवस अगोदरच वजन मापासाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला १ हजार १०० ते १ हजार ७००, दोन नंबर कांद्याला ९०० ते १हजार १००, गोल्टी कांद्याला ३०० ते८५० भाव मिळाला. तर जोड कांद्यास १५० ते ४०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती सचिव परसराम सिनगर यांनी दिली.