Breaking News

डॉ. डी. पी . गाढे यांची प्रभारी प्राचार्यपदी नेमणूक


कोपरगाव ता. प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स , गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. डी. पी. गाढे यांची नेमणूक करण्यात आली. ते महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख होते. त्यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून अनेक वर्ष यशस्वीरित्या विना तक्रार कार्यभार सांभाळला. त्यांनी नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ची पीएच. डी. पदवी प्राप्त केली असून त्यांचे संशोधन कार्यात भरीव योगदान आहे. 

त्यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन शंकरराव कोल्हे, सदस्य अशोकराव काळे, बिपीन कोल्हे, आशुतोष काळे, आ. स्नेहलता कोल्हे, संदीप वर्पे, कारभारी नाना आगवन, विजयराव आढाव, डॉ. गोवर्धन हुसळे, उपप्राचार्य नानासाहेब देवकर, डॉ. भाऊसाहेब निघोट, डॉ. बी. बी. कांदळकर, प्रा. संजय शेटे, अधीक्षक सुनिल गोसावी आदींसह सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर सेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.