Breaking News

‘स्वाभिमानी’ने दैवतांना घातला दुग्धाअभिषेक


राहुरी तालुका प्रतिनिधी

दुधाला प्रती लिटर पाच रूपये दर वाढविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनास राहुरी तालुक्यात प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने दैवताला दुग्धाभिषेक करून निदर्शने करण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्याक्ष रवी मोरे यांनी तालुक्यातील टाकळिमियाँ येथे गावातील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यांना दुग्धाभिषेक करून आंदोलनास सुरवात करण्यात केली. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिर्डी येथे साईबाबांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून निर्देशने करत आली. यादरम्यान शिर्डी पोलीसांनी रवि मोरेसह आंदोलकास ताब्यात घेतले. तसेच सोमवारी जोगेश्वरी आखाडा येथे जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष शिवाजी डौले, नगसेवक प्रकाश भुजाडी यांच्यासह शेतकर्यांनी ग्रामदैवत जगदंबा मातेला दुधाचा आभिषेक करून सरकारला सुद्धबुद्धी देवो, अशी प्रार्थना केली. तांदूळवाडी येथील शेतकर्यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवत दुधाची नासाडी न करता शाळेतील विद्यार्थ्यांना दुधवाटप केले. दरम्यान, शांततेत होत असलेल्या आंदोलनावेळी पोलीस प्रशासनाने शिर्डी येथे रविवारी मध्यरात्री राहुरी तालुक्यातील आंदोलकांना ताब्यात घेतले. यामुळे शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनास चिरडण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय छावा संघटनने आंदोलणास पाठिंबा दर्शवत तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना यांना निवेदन दिले. विविध ठिकाणच्या आंदोलनास देवेंद्र लांबे, प्रविण देशमुख, आदिनाथ तनपुरे, किशोर भोंगळ, मच्छिद्र गुंड, राजेंद्र खोजे आदिंसह तालुक्यातील शेतकर्यांनी पाठिंबा दर्शविला.