Breaking News

बहुजन क्रांती मोर्चाने केले आंदोलन


श्रीगोंदा प्रतिनिधी

तालुक्यातील बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज {दि. ३० } श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. राज्यातील एकूण ३६ जिल्हे आणि ३६७ तालुक्यातील तहसील कार्यालयात या मागण्यांसाठीचे निवेदन तहसिल प्रशासनाकडे देण्यात आले.

बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. वाकडी तालुका, जामनेर, जिल्हा जळगाव येथे मातंग समाजाची मुले विहीरीवर पोहायला गेली म्हणून त्यांची नग्नधिंड काढून त्यांना मारहाण करण्यात आली. भीमा कोरेगाव दंगलीची प्रत्यक्ष साक्षीदार असलेली पूजा सकट हिचा संशयास्पद मृत्यू, जगद्दगुरु संत तुकाराम महाराजांची प्राचीन ऐतिहासिक लेणी व भोवतालचे भूमी माफियांचे अतिक्रमण हटवून सभोवती तटबंदी बांधून या तपोभूमीला वाचवावे. चौंडी, जामखेड येथे धनगर आरक्षणासाठी आंदोलन करनाऱ्या कार्यकर्त्यांवरचे खोटे गुन्हे मागे घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे संतोष वाघमारे यांच्यावर समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. रुद्रवाडी तालुका उदगीर जिल्हा लातूरमध्ये मारुतीच्या मंदिरात दर्शनाला का आलात, असे म्हणत मातंग समाजातील वराला व वर्हाडी मंडळींना बेदम मारहाण केली. आदी अनेक घटनांचा या आंदोलनात निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात राहुल शिंदे, अमित हरिहर, संजय सावंत, आनंद शिंदे, विजय गायकवाड, सुनिक छत्तीसे, भालचंद्र सावंत, विको शिंदे, सुनिल ओहोळ, अशोक शिंदे आदी सहभागी झाले होते.