सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’चे यशस्वी प्रक्षेपण
बालासोर - भारताचे सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र ’ब्रह्मोस’चे सोमवारी ओडिशाच्या बालासोर किनारपट्टीवरील परीक्षण केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ही चाचणी सकाळी साडे दहा वाजता करण्यात आली. सर्व मानकांवर मिसाइलची चाचणी यशस्वी ठरली. याच वर्षी मे महिन्यातही मिसाइलचे परीक्षण करण्यात आले होते. त्यावेळी डीआरडीओने ब्रह्मोस मिसाइलचे आयुष्य 10 ते 15 वर्षे वाढविल्यानंतर चाचणी घेतली होती. मे महिन्यात राजस्थानमधील पोखरण येथे सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ’ब्रह्मोस’चे यशस्वी परीक्षण करण्यात आले होते. ब्रह्मोस जगातील सर्वात जलद अँटी शिप मिसाईल आहे. सूखाई-30 फुल टँक इंधनाबरोबर 2500 किलोमीटरपर्यंत मार करण्यास सक्षम आहे.