महिला आरक्षण विधेयकास काँगे्रसचा पाठिंबा
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिला आरक्षण विधेयक सदनात मांडण्याची विनंती करणारे पत्र लिहिले आहे. तसेच काँग्रेस या विधेयकाला 100 टक्के समर्थन देईल असा विश्वास राहुल यांनी पत्रात व्यक्त केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शासनाच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी सोनिया गांधी यांच्या घरी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. पी चिदंबरम, अहमद पटेल, ए.के अँन्टोनी, आनंद शर्मा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे अनेक बडे नेते या बैठकीला उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशनात भाजपला कसे घेरता येईल याविषयी पक्षश्रेष्ठींनी चर्चा केली. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन भाजपला अडचणीत आणण्याची जबाबदारी खासदार सुश्मिता देव यांना देण्यात आल्याचे समजते. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन देव 24, अकबर रोड येथे आंदोलन करणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा राज्यसभेत अफवांमुळे होत असलेल्या हत्यांवर स्थगन प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत. तसेच काश्मीरच्या मुद्यावर गुलाम नबी आझाद शासनाला घेरतील. याशिवाय भ्रष्ट्राचार, धार्मिक वाद, बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवरही काँग्रेस भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल.