नाणार प्रकल्प लादणार नाही : मुख्यमंत्री
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथल्या प्रस्तावित मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांना विश्वासात घेऊन व चर्चा करुनच याबाबत निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. यासंदर्भात काँग्रेसचे संजय दत्त यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने सागरी किनारपट्टीवर मेगा रिफायनरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गुजरात, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र राज्याने या रिफायनरीसाठी मागणी केली होती. सुमारे तीन लाख कोटी रुपये गुंतवणूक व एक लाख रोजगार निर्माण क रणारा हा प्रकल्प आहे. नवीन रिफायनरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण होत नाही. जगात अनेक देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन रिफायनरी उभारल्या जात असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
