Breaking News

वृक्ष लागवड करून संवर्धन करणे आवश्यक : पिचड



अकोले / ता. प्रतिनिधी 

अकोले तालुका निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे. पट्टाकिल्यावर वृक्ष लागवड व संवर्धन केल्यामुळे निसर्ग सौंदर्यात अधिकच भर पडून पर्यटक आकर्षित होत आहेत. ते आपण सदोदित करणार आहोत. या अभियानात चिमुकल्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांचा सहभाग कौतुकास्पद असल्याचेे प्रतिपादन माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी विश्रामगड तथा पट्टाकिल्ला येथे अभिनव शिक्षण संस्थेचे अभिनव कॉलेज ऑफ सायन्स, मारुतीराव कोते ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल, एम.बी.ए.च्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या वृक्ष लागवड उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात अभिनव शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या विलोभनीय वृक्षदिंडीने झाली. लेझीम पथकाचा ताल धरत विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडीमध्ये सहभाग घेतला. माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड व युवा नेते विक्रम नवले यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विक्रम नवले यांनी आपल्या मनोगतामध्ये वन संवर्धनाचे महत्व विशद केले. प्रा. बाबा खरात यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर वृक्षारोपणास सुरुवात झाली. अत्यंत उत्साहात विद्यार्थ्यांनी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले यांच्या प्रेरणेने व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण केले. अभिनवच्या विद्यार्थिनींचादेखील सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या प्रसंगी वनाधिकारी गोंदके, अकोले पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक इरनक, प्रा. बाबा खरात, अभिनव कॉलेज ऑफ सायन्सच्या प्रा. दीप्ती शेटे, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे विभागप्रमुख प्रा. पांडुरंग गुंजाळ, प्रा. कुसुम वाकचौरे, प्रा. चंद्रकांत कडलग, प्रा. सोनम नाईकवाडी, प्रा. प्रवीण ठुबे, प्रा. शिवशंकर कुडेकर, मीना सावंत, आदिनाथ आभाळे, भरत वाकचौरे, साईनाथ नवले, वन विभागातील सर्व कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.