Breaking News

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

शोपिअन : दक्षिण काश्मीरच्या शोपिअन जिल्ह्यातील कुंडलन गावात सुरु असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीदरम्यान भारतीय लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. मंगळवारी सकाळपासूनच लष्कर आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. जखमी जवानांना लष्कराच्या रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. यातील एका जवानाची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 ते 4 दहशतवादी कुंडलन गावातल्या एका घरात लपून बसले आहेत. या घरातील सदस्यांची अजूनही सुटका करण्यात आलेली नाही. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित असून चकमक सुरु आहे.