महावीर कलादालनातील ‘साहित्य नगरी’स उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर ः पुण्याच्या साहित्य नगरी संस्थेमार्फत येथील महावीर कलादालनात दि. 4 जुलैपासून साहित्य नगरी हे भव्यदिव्य असे पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन सप्टेंबर अखेरपर्यंत चालणार आहे, अशी माहिती साहित्य नगरीचे संस्थापक नवनाथ भाबड यांनी दिली. गेल्या पंधरा वर्षापासून साहित्य नगरीच्यावतीने नगरमध्ये प्रदर्शन आयोजित केले जात आहे. या प्रदर्शनात मान्यवर लेखकांची व प्रकाशकांची पुस्तके आहेत. त्यात धार्मिक चरित्र, ऐतिहासिक, ललित साहित्य, आरोग्य, शैक्षणिक, एमपीएससी कोश, पाककला, विज्ञान, पर्यटन, भविष्य, व्यक्तीमत्व विकास, इंग्रजी, अनुवादीत, सर श्री, ओशो, नारायण धारप, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके तसेच व. पु. काळे, विश्वास पाटील, अच्युत गोडबोले, पू. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, शंकर पाटील, चेतन भगत, सुधा मुर्ती, द. मा. मिरासदार, वि. स. खांडेकर, रॉबिन शर्मा, रणजित देसाई, आनंद यादव, जयसिंगराव पवार, अब्दुल कलाम यासारख्या अनेक लेखकांची पुस्तके उपलब्ध आहेत. या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे लहान मुलांसाठी बालविभाग यात इंग्रजी, मराठी गोष्टींच्या पुस्तकांसहीत कलर्स, एबीसी, स्टोरी बुक्स, प्रोजेक्ट आदी उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू आहे.
