पाटोदा सरपंचपदी चांदबी पठाण बिनविरोध
जामखेड / ता. प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील व जवळा जिल्हा परिषद गटातील राजकीय दृष्टीने आतिशय महत्वाची मानली जाणारी गरडाचे पाटोदा येथिल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चांदबी मदेखान पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी फटाके फोडून मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले.
11 सदस्य असलेली पाटोदा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड नुकतीच करण्यात आली. गेल्या तीन वर्षांनपुर्वी रत्नमाला छगन खटके यांची प्रथम निवड झाली होती. त्यांचा दीड वर्षांचा कार्यकाळ संपल्याने पुन्हा दीड वर्षांसाठी अर्चना सिध्दार्थ थोरात यांच्या निवड झाली होती. यानंतर त्यांचाही कार्यकाळ संपल्याने नुकतीच चांदबी मद्देखान पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडीदरम्यान उपसरपंच महादेव कदम, माजी उपसरपंच गफ्फार पठाण, माजी रतनताई खटके, अर्चना थोरात, चांगुना पवार, दादा राऊत, सविता माने, दिनकर टापरे, अंबादास पवार, गहिनीनाथ कीरदात आदी उपस्थित होते. यानंतर सरपंच चांदबी पठाण यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सरपंच पठाण म्हणाल्या की, पाटोदा ग्रामपंचायतीच्या विकासासाठी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामे करणार, तसेच पाटोदा येथिल प्रवाशांसाठी निवारा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेची शाळा दुरुस्ती करुन नविन इमारत बांधणार आहोत. सुशिक्षित बेरोजगारांना शॉपींग कॉम्प्लेक्स उभारण्यात येईल, तसेच वृक्षारोपण व घर तीथे शौचालय बांधण्यात येईल असे सांगीतले.
यावेळी छगन खटके, माजी सरपंच समिर पठाण, वसीम कुरेशी, अरुण थोरात, प्रविण गायकवाड, जोगेंद्र थोरात, दत्तात्रय निंबाळकर, सादिक शेख, अन्सार पठाण, राजु क्षिरसागर, सत्तार पानसरे, समिर सय्यद, अरुण आमटे, संतोष टापरे, सर्फराज पठाण, हनीफ पठाण, तय्यब पठाण यांच्यासह पाटोदा गावातील व तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.ए पाचरणे, कामगार तलाठी कटारनवर व ग्रामविकास अधिकारी करंगळे यांनी काम पाहिले.
