गाईच्या दुधाच्या प्रचलित दरात लिटरला तीन रुपयाने वाढ करण्याचा निर्णय
पुणे : गाईच्या दुधाच्या प्रचलित दरात लिटरला तीन रुपये वाढ करण्याचा निर्णय खासगी आणि सहकारी दूध संघांनी संयुक्तपणे घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 21 जुलैपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे दुधाचा प्रति लिटरचा खरेदी दर 20 ते 22 रुपये होण्याची अपेक्षा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतक-यांना थेट पाच रुपये अनुदान देण्याची मागणी केली असून, 16 जुलैपासून दूध संकलन बंद करून मुबंईचा दूध पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. तर दूध भुकटी निर्यातीला किलोस 50 रुपये अनुदान राज्यसरकारने जाहीर केले आहे. यामुळेच तातडीने बेठक घेऊन दूध दरवाढीचा निर्णय जाहीर केल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्र सरकारने तूप व लोण्यावरील 12.5 टक्के जीएसटी कमी करून 5 टक्के केल्यास एक रुपया आणि शालेय पोषण आहारात दूध वाटप केल्यास आणखी एक रुपया म्हणजे दूध उत्पादकाला एकूण 5 रुपये वाढ दिली जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.