Breaking News

ग्रामपंचायतीसाठी आता ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ - ऊर्जामंत्री


नागपूर : राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी आता ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ नेमण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभेत सदस्यांनी नियम 293 अन्वये प्रस्तावावर चर्चा उपस्थित केली. त्याला उत्तर देताना श्री.बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सुरळीतपणे विद्युत पुरवठा आणि वीज बिलांबाबतची समस्या सोडविण्यासाठी राज्यातील 23 हजार ग्रामपंचायतीमध्ये ‘एक ग्रामपंचायत, एक आयटीआय विद्यार्थी’ हा उपक्रम राबवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आयटीआय इलेक्ट्रिकल झालेल्या विद्यार्थ्याची ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात येणार असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.