Breaking News

दोन लाख 50 हजार शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी देणार


राज्यात थकित वीजबिलामुळे कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज जोडणी कट केलेले नसून यापुढील काळात दोन लाख 50 हजार शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी देणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर यापूर्वी वीज निर्मितीसाठी शेतकऱ्यांसाठीचे पाणी आणि पिण्याचे पाणी वापरता येणार नाही. त्यामुळे सांडपाण्यावर वीजनिर्मिती करण्याची योजना राबविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. तसेच राज्यातील उद्योगांना छत्तीसगडपेक्षा दोन रुपये कमी दराने वीज पुरवठा करण्यात येत असल्याची माहितीही श्री.बावनकुळे यांनी उत्तरात दिली.

यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, जयंत पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.