उत्तराखंडच्या पावसाच्या तडाख्यात 5 जण मृत्यूमुखी
देहरादून : उत्तराखंडला पावसाचा जबरदस्त तडाखा बसत आहे. राजधानी देहरादूनमध्ये पावसामुळे घर पडून 5 जणांचा मृत्यू झाला. तसेच राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांना नुकसान पोहोचले आहे. देहरादूनच्या वसंत विहार परिसरात पावसामुळे घर पडून 5 जण मृत्यूमुखी तर 2 जण जखमी झाले आहेत. तर रिस्पना नदीमध्ये एक तरुण वाहून गेल्याचीही माहिती मिळत आहे. मुसळधार पावसामुळे ऋषिकेश गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. तर सुरकंडा येथे दरड कोसळून मसुरी-टिहरी रस्ता बंद झाला आहे.राज्यभर होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला आहे. आपत्ती व्यवस्थापनेचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
