Breaking News

दूध भुकटी’ निर्यातीसाठी प्रतिकिलो 50 रुपये अनुदान

विधीमंडळ अधिवेशनात सोमवारी कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी दुध दर आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करून सभागृहात गोंधळ घातला. विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. या दरम्यान पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत सरकारच्या वतीने निवेदन सादर केले. या निवदेनात दुधाच्या भुकटीला निर्यातीसाठी 50 रुपये प्रतिकिलो अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच बटर आणि लोणीवरील जीएसटी कर कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पोषण आहारात प्राधान्याने दूध घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात 60 टक्के दूध उत्पादन खासगी डेरी द्वारे होतेय. तसेच सरकारी दूध संघाचा हिस्सा केवळ 40 टक्के आहे. त्यानुसार या बाबतीत बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासनही देण्यात आले.