लोटस मध्ये रेड फ्लॉवर डे साजरा.
सोनई/प्रतिनिधी - शनिशिंगणापूर येथील लोटस इंग्लिश स्कूलमध्ये नुकताच रेड फ्लॉवर डे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुलांनी लाल रंगाचे पोषाक परिधान केले होते. लाल रंगाचे विविध प्रकारचे फुले आणली होती. शाळेतील वातावरण लाल रंगमय झाले होते. मुलांनी विविध प्रकारचे फुलांचे आकार असलेले चेहरे तयार करून आणले होते.
लाल रंगाचे महत्व, लाल रंग कुठे वापरतात, लाल रंग कशाचे प्रतीक आहे. तसेच फुलांचे महत्त्व ,प्रकार,रंग,निसर्गामध्ये फुलांचे कार्य या विषयी मुलांना माहिती देण्यात आली. मुलांनी जेवनाच्या डब्यामध्ये लाल भाज्या आणल्या होत्या. हसत खेळत शिक्षण या संकल्पनेतून असे उपक्रम शाळेत होणे काळाची गरज असल्याचे डॉ बानकर म्हणाल्या. सर्व मुलांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा केला व आनंद घेतला.
सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशश्वते साठी मेहनत घेतली.
प्राचार्य वाघ यांनी आभार मानले.
