Breaking News

पंतप्रधान मोदी यांची ‘निवडणूकपूर्व पेरणी’ खरीप हंगामातील 14 पिकांच्या हमीभावात वाढ


नवी दिल्ली : 17 व्या लोकसभेला सामौरे जाण्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांची नाराजी दूर करण्यासाठी खरीप हंगामातील तब्बल 14 पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ करण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय कॅबिनेटने घेतला. पंतप्रधान मोदी यांचा हा निर्णय निवडणूकपूर्व पेरणी असल्याचे बोलले जात आहे.
सातत्याने होणारे शेतकर्‍यांचे आंदोलनामुळे भाजप सरकार चांगलेच अडचणीत सापडले होते, शेतकर्‍यांची वाढती नाराजी बघता, शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित होते, त्यामुळे पंतप्रधानांनी 14 पिकांच्या हमीभावात वाढ करत शेतकर्‍यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विं टलने वाढवून तो 1750 रूपये क्विंटल इतके केले आहे.
खरीप हंगामातील 14 प्रमुख पिकांच्या हमीभावात उत्पादनखर्च अधिक 50 टक्क्यांच्या वाढीनं हमीभावात वाढ करण्याच्या सूत्राला मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीनं या नव्या दरांच्या वाढीला मंजूरी दिली. यानुसार धानाच्या हमीभावात प्रतिक्विंटल 200 रुपयांची वाढ घोषित करण्यात आली. महाराष्ट्रातल्या ज्वारी या पिकाला सर्वाधिक भाववाढ मिळाला आहे. त्यापाठोपाठ तूर, मूग आणि उडदाच्या दरातही वाढ करण्यात आली. रागीच्या दरात जवळपास 1 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ प्रस्ता वित आहे. सरकारनं सरासरी प्रति क्विटंल 200 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंत भाववाढ जाहीर केली. हमीभावात दीडपट वाढ करुन सरकारने 2019 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु केली. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार मोदींनी आपला शब्द पाळण्यासाठी ही कवायत सुरु केली असली, तरी याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल, तेव्हाच या हमीभावाढीचा शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.
पिकांचे हमीभाव क्विटंलमध्ये...
ज्वारी - 2430 रुपये
बाजरी- 1950 रुपये
भात- 1750 रुपये
तूर- 5675 रुपये
कापूस- 5450 रुपये
भुईमूग- 4890 रुपये
सोयाबीन- 3399 रुपये
मूग- 6975 रुपये
उडीद- 5600 रुपये
मका- 1700 रुपये
सूर्यफूल-5388 रुपये

ऐतिहासिक वाढ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धान्याच्या किमान आधारभूत किमतीत ऐतिहासिक वाढ करून शेतकर्‍यांना दिलेले आश्‍वासन पूर्ण केल्यामुळे मी समाधानी असल्याचे ट्विट के ले. ध
शेतकर्‍यांना धान्यासाठी किमान आधारभूत किंमत (मिनिमम सपोर्ट प्राइस) उत्पादनमूल्याच्या दीडपटीने जास्त देण्याचे सरकारने ठरवले आहे. ही वाढ ऐतिहासिक आहे. सर्व शेतकर्‍यांना शुभेच्छा, ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. कृषिक्षेत्राच्या विकासासाठी माझं सरकार कटिबद्ध आहे आणि त्यादिशेने आम्ही प्रयत्न केले असून याच दिशेने यापुढेही प्रयत्न करू असं मोदी म्हणाले आहेत.