Breaking News

फटाक्याच्या कारखान्यातील स्फोटात 11 जणांचा मृत्यू

वारंगळ - फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील कोटीलिंगाला जिल्ह्यातील फटाक्याच्या गोडावूनमध्ये हा स्फोट झाला.
स्फोट झाला त्यावेळी भद्रकाली फायर वर्क्स या फटाक्याच्या कारखान्यात एकूण 25 कामगार काम करीत होते. यात एकूण 11 कामगारांचा यात जागीच मृत्यू झाला. तर इतर कामगारांचा शोध सुरू आहे. जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.