Breaking News

शासनाकडून विभागच दुर्लक्षीत कालबाह्य शस्त्र प्रकरण

नितीन मोरे / औरंगाबाद
महाराष्ट्रात गडचिरोली आणि अन्य भागात नक्षलवादी चळवळीचा त्रास मोठ्या प्रमाणात आहे. दुर्गम भागात असूनही या नक्षलवाद्यांकडे नेहमीच आधुनिक शस्त्रे आढळून येतात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर आक्रमण होण्याचे सावट नेहमीच असते. मराठवाडा इसिस च्या विळख्यात आहे. जातीय तणाव आणि धर्मांधांक डून आक्रमण होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राचा शस्त्र विभाग नेहमीच आधुनिक आणि परिपूर्ण हवा. या विभागाकडे आजपर्यंत अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळातील अंतर्गत संरक्षणासारख्या क्षेत्रात झालेल्या गंभीर चुका आहेत. पोलीस दलात शस्त्र विभाग हा सर्वांत महत्त्वाचा आहे; मात्र दुदैवाने हा विभागच सर्वांत दुर्लक्षित विभाग ठरला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा विभाग आहे. या विभागाकडे पुरेसा शस्त्रसाठाही आहे; मात्र हा साठा केवळ दिखावाच ठरावा, अशी स्थिती आहे. पोलीस दलात अनुमाने 3 लक्ष शस्त्रे आहेत. यातील 90 टक्के शस्त्रांचे आयुर्मान संपलेले आहे. ही शस्त्रे पुन्हा कर्तव्यासाठी  वापरायची असतील, तर तज्ञांकडून प्रमाणित करणे अपेक्षित असते. असे असतांना वर्ष 1996 पासून शस्त्र शाखांमध्ये असे तज्ञांचे पदच रिक्त आहे. त्यामुळे लक्षावधी शस्त्रे प्रमाणित झालेली नाहीत. भविष्यात राज्यात अचानक मोठे आक्रमण झाल्यास ही शस्त्रे योग्य पद्धतीने काम करतील, याची निश्‍चिती कोणीच देऊ शकत नसल्याने ती चालवणार्या पोलिसांचे आयुष्यही धोक्यातच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या विभागाला शस्त्र तपासणीसाठी मुंबई वगळता राज्यात कुठेही तज्ञांची नियुक्तीच करण्यात आलेली नाही.
*नेमणकीतही भ्रष्टाचार
परविक्षाधीन काळासाठी काही माजी सैनिकांच्या अनधिकृत नेमणुका केल्या आहेत. या परविक्षाधीन काळ हा दोन वर्षासाठी असतो. त्यामध्ये चाचण्या परीक्षा देणे अ निवार्य आहे. या अधिकार्यांच्या चाचण्या न देता त्यांना नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस नियमावली 79-क प्रमाणे विना चाचणी त्यांना नोकरीवर ठेवता येत नाही. सेवानिवृत्त पांडुरंग गायकवाड यांनी माहिती आयोगाकडून मागविलेल्या माहितीच्या अधिकारात. या संबधीची माहिती उपलब्ध नसल्याचे बिनबुडाचे उत्तर गृह विभागाने दिले आहे. पोलिस नियम 55अ मधील कलम 2 प्रमाणे वरील सर्व बाबींची पुर्तता केल्याशिवाय कामावर हजर राहता येत नाही. तरी सुध्दा गृहविभागाने यामध्ये भ्रष्टाचार करून ही पदे भरलेली आहे. भाग-1,79 क- कलामाप्रमाणे परविक्षाधीन काळात दिलेल्या चाचण्या उर्तीण न झाल्यास त्यांना कामावरून काढुन टाक ण्याची तरतुद करण्यात आली आहे. 
*सरावाचाही अभाव
पोलिसांनी शस्त्र चालविण्याचा सराव नियमीत करणे अपेक्षीत असते. मात्र ग्र्रामीण भागात तोही केला जात नाही. अनेकदा सरावाच्या वेळी शस्त्र निकामी झाल्याचे आढळुन येते. पोलिसांवर प्रत्यक्षात शस्त्र चालविण्याची वेळ फारच कमी वेळा येत असली तरी त्यासाठी सज्जता हवीच. प्रमाणीत शस्त्रे आणि प्रशिक्षीत पोलिस सज्ज ठेवणे गरजे आहे.