Breaking News

शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखपदी मुकूंद गवळी

पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथिल युवा सामाजिक कार्यकर्ते मुकूंद परशुराम गवळी यांची शिवसेना उपविभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली. आ. विजय औटी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले व शिवसेना तालुकाप्रमुख बंडू रोहोकले यांनी गवळी यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी जि.प. सदस्य काशिनाथ दाते, शिरीष साळवे, बाबुर्डीचे उपसरपंच गोरख दिवटे, अरूण कळमकर, राजु घावटे, रोहीत परांडे, विकास वाबळे, महेश म्हस्के, गणेश शिंगोटे, संदीप वाबळे, ओंकार शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मुकूंद गवळी म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे तसेच शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर व आ. विजय औटी, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख बंडू रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे संघटन करणार असून शिवसेनेचे ध्येयधोरण सर्वसामान्य जनतेच्या तळागळापर्यंत पोहोचविणार असल्यचे त्यांनी सांगितले. पुढील काळात शिवसेना पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मुकूंद गवळी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.