आयसिसाच्या तिसर्या क्रमांकाच्या कमांडरला औरंगाबादमधून अटक
मुंबई, 23 - महाराष्ट्रातील औरंगाबादमधून इमरान पठाण या आयसिसाच्या तिसर्या क्रमांकाच्या कमांडरला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून अटक झालेल्यांचा आकडा 15 वर पोहचला आहे.
उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमधून रिझवानला आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून ताब्यात घेण्यात आलं आहे. मालवणीमधील मुलांची दिशाभूल करुन आयसिसमधे सामील करुन घेतल्याच्या आरोपानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. भारतातल्या आयसिस मॉड्युलच्या कमांडर्सपैकी एका टॉप कमांडरला काल मुंब्र्यातून अटक करण्यात आली. त्यानंतर दुसर्या कमांडरला उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमधून तर औरंगाबादमधून तिसर्या क्रमांकाचा कया मॉड्यूलचा प्रमुख मुद्दसर मुश्ताक शेखला मुंब्र्यातून अटक केली आहे. मुद्दसर मुस्ताक शेख हा सीरियामध्ये आयसिससाठी तरुणांची नेमणूक करणार होता. देशात 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.