Breaking News

जलतरणमध्ये महाराष्ट्राच्या नीलला सुवर्ण


पुणे

४५ व्या ज्युनिअर आणि ३५व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या नील रॉयने सुवर्णपदक पटकावत नव्या विक्रमाला गवसणी घातली.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरु असणाऱ्या या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात नील रॉयने २ मिनिटे १०.२६ सेकंद वेळ नोंदवत आपलाच पूर्वीचा विक्रम मोडला. २०१६मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या स्पर्धेत नीलने २ मिनिटे १०.७४ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. मध्य प्रदेशच्या अद्वैत पागेने (२ मि. ११.८९ से.) रौप्यपदक, तर दिल्लीच्या विशाल ग्रेवालने (२ मि. १५.१७ से.) ब्राँझपदक मिळवले. नीलने स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे.