Breaking News

माऊली इंग्लिश मेडियम मध्ये पर्यावरण दिन उत्साहात

पारनेर ताालुक्यातील सुपा येथे मंगळवारी माऊली शिक्षण संस्था इंग्लिश मेडियम स्कूल सुपा येथे पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, पश्‍चिम महाराष्ट्र विकास मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, जि.प.चे माजी अध्यक्ष आझाद ठुबे, भाजपाचे ज्येष्ठनेते वसंत चेडे, शंकर नगरे, दिनेश औटी, पत्रकार मार्तंड बुचुडे आदी यावेळी उपस्थित होते. वृक्षारोपनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसमवेत पार पाडण्यात आला. विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक माहिती व वृक्षांची गरज आदीबाबत माहिती सांगण्यात आली. यावेळी माऊली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादा पठारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर सुरेश पवार यांनी आभार मानले.