प्रा. संतोष भास्कर यांना पी एच डी प्रदान
कोपरगाव शहर प्रतिनीधी
तालुक्यातील शिंगणापूर येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविदयालयाचे मेकॅनिकल विभागाचे प्रा. संतोष भास्कर यांना पुणे विदयापिठाने नुकतीच पी एच डी प्रदान केली. त्यांनी ट्रायबाॅलाॅजिकल बिहविअर आॅफ फोटेड नायट्रायट्रेड एआयएसआय ४ हजार ११० स्टील फाॅर व्हेरिअस पॅरामिटर्स या विषयावर प्रबंध सादर केला होता. याकामी त्यांना डाॅ. हरि कुदळे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या यशाबद्दल माजीमंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, आ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डाॅ. ए. जी. ठाकूर, प्राचार्य डाॅ. डी. एन. क्यातनवार आदींनी अभिनंदन केले.
