Breaking News

‘आत्मा मालिक’चा जोशी प्रथम


कोपरगाव ता. प्रतिनिधी : येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या ओम गुरूदेव माध्यमिक गुरूकुलाने १० वर्षांची परंपरा कायम राखली. इयत्ता १० वीच्या १०० टक्के निकालाची नोंद केली. विद्यालयाचा विदयार्थी प्रसाद जोशी याने ९९. ८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकविला. 

विद्यायालयातील ३३० विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते. विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, सागर आहिरे, मिना नरवडे, सचिन डांगे, पर्यवेक्षक बाळासाहेब कराळे, रविंद्र देठे, अनिल सोनवणे, वर्गशिक्षक नयना शेटे, गणेश रासने, नितीन अनाप, राजश्री चाळक, दत्तात्रय भुसारी, सोनाली वाणी, अनिल डुकरे, संजय कहांडळ आदींचे मार्गदर्शन लाभले.

आश्रमाचे संत देवानंद महाराज, परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष भगवान दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भांगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, माधवराव देशमुख, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे व पालकांनी या या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.