Breaking News

गोवंशमांस विक्रीप्रकरणी पोलिसांची बेधडक कारवाई


कोपरगाव शहर प्रतिनिधी : शहरातील आयशा कॉलनी, संजय नगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्याची बंदी आहे. मात्र असे असताना गोवंशमांस विक्री करतांना व अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तल करीत असल्याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांविरुद्ध कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. 

या धंद्यामुळे शहरातील भरवस्तीत संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होईल, असे माहित असतानादेखील कत्तलीसाठी गोवंश जनावरे बांधून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे मज्जु हुसैन कुरेशी, कैसर अजीज शैख, खलील जमाल कुरेशी आणि मौसीन फारूक कुरेशी (संजयनगर, कोपरगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये घटनास्थळाहून १ हजार ५०० रुपये किंमतीचे १५ किलो गोमांस,पाचशे रुपयांचा तराजू काटा, २० हजार रुपये किंमतीची गोवंशजातीची दोन जीवंत वासरे, कत्तलीसाठी वापरण्यात आलेली हत्यारे असे एकूण २२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.