Breaking News

इप्तार पार्टीमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

सध्या पवित्र रमजान महिना चालू असून अहमदनगर शहरात अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येवुन इप्तार पार्टीचे आयोजन करत आहे. झेंडीगेट सोशल क्लबने आयोजित केलेल्या इप्तार पार्टीत सर्वधर्मीयांनी उपस्थिती लावुन एकतेचा संदेश दिला. या इप्तार पार्टीमध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन दिले. यामुळे समाजामध्ये एक चांगला व एकीचा संदेश मिळाला आहे. झेंडी गेट सोशल क्लबतर्फे वर्ष भर सामाजिक, शैक्षणिक, समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. 


याप्रसंगी झेंडीगेट येथे हनुमान मंदिर मधील पुजारी रामभाऊ, नगरसेवक नज्जु पैहलवान, रशिद जहागिरदार, इम्रान जहागिरदार, फैयजान शेख, सय्यद ऐजाज खाजा, हेल्पींग हॅण्ड युथ फाऊंडेशचे संस्थापक भैय्या बॉक्सर, स्ट्युटंड पॉवर फाऊंडेशनचे संस्थापक सय्यद मोहसीन, आवेज शेख, खिजर सय्यद, सद्दाम कुरेशी, ततमीम शेख आदींसह झेंडीगेट परिसरातील सर्व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.