Breaking News

दिलीप पाठक यांच्या कादंबरीस महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार


सातारा - दिलीप पाठक यांनी लिहीलेली विथ नो गॉडफादरही बँकींग क्षेत्रावरील नाविन्यपूर्ण कादंबरी अरुणराव गोडबोले यांच्या कौशिक प्रकाशन, सातारातर्फे नोव्हेंबर 2017 मध्ये अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांच्या हस्ते प्रकाशित झाली. 
एका बुडणा-या बँकेला त्याच बँकेतील एक जिद्दी तरुण समविचारी सहका-याच्या मदतीने बुडण्यापासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि त्याचवेळी वरिष्ठांचे गैरकारनामे उघडकीस आणून त्यांना बँक सोडण्यास भाग पाडण्यासारखी परिस्थिती निर्माण करुन त्यात यशस्वी होतो का? याची रंजक कहाणी म्हणजेच ही कादंबरी. 
या त्यांच्या कादंबरीस महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी 2017 मधील उत्कृष्ट साहित्यकृती म्हणूनपुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भव्य कार्यक्रमात सन्मानपत्र व सुभाष गोखले हे पारितो षिक प्रतिमा राय (ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध उडिया लेखिका) यांच्या शुभ हस्ते प्रदान करुन त्यांचा गौरव केला.