Breaking News

गोदानातून भगवंताशी नाते व सेवेची अनुभूती निश्चित ह.भ.प. मुकुंद काका जाटदेवळेकर


नगर- गोमाता हि कामधेनु असून तिच्या पासून अनेक फायदे आहेत.शास्त्रीय दृष्ट्या पाहिले तर गाई व मनुष्य जीवनाचा परस्पर संबंध लक्षात येतो.अशा या गोमातेच्या दानाची परंपरा व संस्कृती जोपासण्याचे कार्य वनिता मंडळ व मानधना परिवाराने केले आहे,या गोदानाच्या माध्यमातून भगवंताशी नाते व सेवेची अनुभूती निश्चित त्यांना प्राप्त होईल असा विश्वास ह.भ.प.मुकुंद काका जाटदेवळेकर यांनी व्यक्त केला.

वनिता मंडळ अ.नगरच्या वतीने नक्षत्रलाँन येथे पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित गोदान,गोयज्ञ व गोखाद्य तुलादान कार्यक्रम ह.भ.प.मुकुंद काका जाटदेवळेकर यांच्या उपस्थितीत व यजमान मोहनलाल व पराग मानधना यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी मानधना परिवारातील सौ. मधुमालती,सौ.कोमल,देआंश,ची.सनाचा व ज्योती दीपक , वनिता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.वैष्णवी तोष्णीवाल,उपाध्यक्षा सौ. राखी बिहाणी,सचिव सविता सोमाणी, सौ.कविता मंत्री ,सौ.भारती सोनी ,सौ.शोभा झंवर, गंगा जाखोटीया,उपस्थित होते.

यावेळी मुकुंदकाका म्हणाले कि,घरच्याचा पाठिंबा व समाजाने दिलेल्या पाठबळावर चैतन्य गोशाळा उभी राहिली,८ वर्षापूर्वी ८ गाई पासून सुरवात झालेल्या यागोशाळेत आज तिनशे गाई आहेत.अनेकांच्या सहकार्याने गोसेवेला गती प्राप्त झाली आहे.दिनदुबळ्या ,भाकड,प्राणाचा भरोसा नसलेल्या गाई आज येथे आनंदाने जगत आहेत.विनिता मंडळाने सामुहिक गोदानाचा अभिनव उपक्रम राबवून गोदान तर केलेच पण त्या गाईसाठी वर्षभराचा चाराही दिला,अशी गाय प्रथमच आमच्या गोशाळेत येत आहे.

मुख्य यजमान मोहनलाल मानधना यांनी वनिता मंडळाच्या उपक्रमाचे कोतूक केले.गोदान व गोसेवेची प्रेरणा सर्वांना मिळावी यासाठी अशा उपक्रमात सर्व वैष्णव समाजाल सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले व या सामुहिक गोदान उपक्रमाचे यजमानपद दिल्या बद्दल आभारही मानले.

मान्यवरांच्या उपस्थित व यजमान मानधना परिवाराच्या हस्ते सामुहिक गोदान करण्यात आले.या गोदानाचा स्विकार चैतन्य गोशाळेचे ह.भ.प. मुकुंद काका जाटदेवळेकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली तोष्णीवाल यांनी केले तर आभार प्रकल्प प्रमुख सौ.भारती सोनी यांनी मानले.कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच माहेश्वरी समाज बांधव उपस्थित होते.शेवटी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.