Breaking News

केळवे बीचवर चार पर्यटकांचा बुडून मृत्यू

पालघर तालुक्यातील केळवे बीचजवळ पर्यटनासाठी आलेल्या नालासोपारा येथील चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. यामधील एकाचा मृतदेह आढळून आला असून अन्य तिघांचा शोध सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. दीपक परशुराम चालवाडी (वय 20), दिपेश दिलीप पेडणेकर (वय 17), श्रीतेज नाईक (वय 15), तुषार चिपटे (वय 15), अशी मृतांची नावे आहेत. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार असल्याने केळवे बीच पर्यटकांची गर्दी झाली होती. नालासोपारा येथे काही युवक ग्रुपने पर्यटनासाठी आले होते. हे सर्वजण खवळलेल्या समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघे बुडाले. या घटनेनंतर तातडीने बचावकार्यास सुरूवात करण्यात आली यावेळी एकाचा मृतदेह हाती लागला मात्र, यातील तिघांना वाचवण्यात अपयश आले. बचाव यंत्रनेकडून अन्य युवकांचा शोध घेणे सुरू असून पोलिस घटनास्थळी दाखल आहेत. समुद्रात हायटाईड उसळत असल्याने मृतदेह शोध मोहीम थांबण्यात आली आहे. ही सर्व मुले संतोष भुवन नालासोपारा पूर्व येथील आहे. 15 ते 20 वयोगटातील ही 7 मुले फिरण्यासाठी आली होती. रविवारी दुपारी अडीच वाचताच्या सुमारास ही मुले पोहण्यासाठी गेले होते. 
चौकट....
समुद्राला भरती असल्याने झाला घात ...
पोहण्याचा मोह अनेकांच्या अंगाशी येत असून अनेकांना आपला जीव गमावण्याची पाळी येत आहे. नालासोपारा येथील सुमारे सात जण पालघर येथील केळवे बीचवर फिरायला आले होते. यातच त्यांचा पोहण्याचा मोह झाला. मात्र समुद्राला भरती असताना पर्यटक पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडली, असे सांगण्यात येत आहे.