Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी मोर्चा

नवी दिल्ली : दिल्लीत सलग सात दिवस धरणे आंदोलन करणार्‍या आम आदमी पक्षाने रविवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी मोर्चा काढला, यावेळी मंडी हाऊसमधून निघालेल्या या मोर्चाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनेही पाठिंबा दर्शवला आहे. या मोर्चामध्ये माकपचे सिताराम येचुरीही सामील झाले आहे.

केंद्र सरकारच्या दबावामुळे सरकारी अधिकार्‍यांनी दिल्ली सरकारशी असहकार पुकारल्याचा आरोप करत नायब राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा या मागणीसाठी केजरीवाल यांनी 7 दिवसांपासन त्यांच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडली आहे.