Breaking News

अतिक्रमण कारवाईत हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी


जामखेड शहर प्रतिनिधी  
शहरातील अतिक्रमणे हटविण्यात येत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लियाकत काझी व नगरपरिषदेचे मूख्याधिकारी विनायक औंधकर यांनी कामात हलगर्जीपणा करुन अतिक्रमण काढण्याच्य कारवाईतून काढता पाय घेतला त्यामुळे शहरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई थांबली .या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जिव्हाळा फाऊंडेशन च्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील वाहतुकीची प्रश्न दिवसेंदिवस दिवस गंभीर बनत चालला असल्याने तसेच नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी दि .१९ रोजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित केली होती. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लियाकत काझी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह शहरातील सर्व स्तरातील नागरीक उपस्थित होते. या वेळी अधिकार्‍यांसह सर्वांनी शहरातील वहातुक सुरळीत करण्याचा निर्णय घेऊन शहरातील रोडच्या बाजुची अतिक्रमणे हटविण्याबाबत सांगितले होते. या नंतर लगेचच दि २० जुन पासून अतिक्रमणाची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र अचानक दुसर्‍या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता काझी व मुख्याधिकारी विनायक औंधकर हे दोघे अतिक्रमण काढत आसलेल्या ठिकाणी फिरकलेच नाहीत. संबधीत अधिकारी आपली जबाबदारी सोडून निघून गेले त्यामुळे अतिक्रमणाची कारवाई थांबली. अतिक्रमण काढण्याच्या दृष्टीने लेखी देण्यास सांगितले मात्र दिले नाही तर मूख्याधिकारी शहरात अतिक्रमण काढण्याची मोठी कारवाई होत असतांना पाच सहा दिवसापासुन गैरहजर राहिले .घटनेला पाच ते सहा दिवस होऊन गेले असल्याने अतिक्रमणे हटविण्याची कारवाई थांबली .परीणामी शहरातील वाहतुकीचा प्रश्न प्रश्नच राहीला .
नगर ते बीड रोडवरील सांडपाणी वाहून जाण्यासाठी मोठ्या गटारींची कामे केली आहेत. मात्र त्या गटारी देखील बुजल्या आहेत ती उकरून काढावी . परीणामी पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे. तसेच रोडच्या लगत महावितरणाचे विजेचे खांब त्वरित दुसर्‍या ठिकाणी बसविण्याची व्यवस्था करावी तसेच खर्डा चौकातील उर्दू मुलांच्या शाळेसमोरील भींत पाडून रोडची रूंदी वाढवण्यात यावी व शाळेच्या पाठीमागील विश्रामगृहाची भिंत पाडुन विश्रामगृहा समोरील मोकळी जागा मुलांना खेळायला उपलब्ध करून द्यावी. अशा विविध मागण्या जिव्हाळा फाऊंडेशन च्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे म्हटले आहे. निवेदन देतांना जिव्हाळा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष प्रा मधुकर राळेभात, सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ घायतडक, गुलाब जांभळे, अवधूत पवार, शेरखान पठाण, मैलाना खलील, प्रा.शहाजी डोके, रामभाऊ इंगळे सह जिव्हाळा फाऊंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते. 

मूख्याधिकारी पार्ट टाईम की फूल टाईम - विठ्ठल राऊत
जामखेड शहरातील अतिक्रमण सारख्या संवेदनशील कामात मूख्याधिकारी गैरहजर राहतात हा बेजबाबदारपणा आहे. मुख्याधिकारी जामखेडला रूजू झाल्यापासून आज पर्यंत कीती तास व कीती दिवस मुख्यालयात थांबले हे सर्व जनतेला माहिती आहे.कायम मूख्याधिकारी नसल्याने गेले दोन वर्षे नगरपरिषदेच्या विकास कामाबद्दल ठोस निर्णय होऊ शकले नाहीत.