Breaking News

माजी विद्यार्थ्याकडुन होतकरु मुलांना शालेय साहित्य वाटप


कुळधरण  प्रतिनिधी  
कर्जत तालुक्यातील खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातील होतकरु विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्याकडुन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्राचार्य चंद्रकांत चेडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यालयातील माजी विद्यार्थी व कृषी अधिकारी हिंदुराव मोरे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या चार वर्षांपासुन गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, बॅग, चप्पल व इतर सर्व शालेय साहित्याचे वितरण केले जात आहे. सोमवारी विठ्ठल मोरे, भरत मोरे, सोमनाथ वाघमारे, अमोल आगवण यांच्या प्रमुख उपस्थितीत चालु शैक्षणिक वर्षातील साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक भुमीकेतुन मोरे कुटुंबियांकडुन हा उपक्रम राबविला जात आहे. वंचितांना आपल्या परीने न्याय देण्याचा हा प्रयत्न असल्याचे आण्णासाहेब मोरे यांनी प्रास्ताविकातुन सांगितले. विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य चंद्रकांत चेडे यांनी मोरे कुटुंबियांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त करुन विद्यार्थ्यांसाठी केलेल्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी मुगुटराव शेजाळ, काशिनाथ सोनवणे, रुपचंद गोळे, आण्णासाहेब लोखंडे, तात्याराम गावडे, प्रा.संदिप भिसे, बाळासाहेब काळे, पंकज काराळे, वरिष्ठ लिपिक विकास कुलकर्णी, बापु शेटे, बारिकराव शेटे, वालचंद यादव आदी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मारुती सायकर यांनी आभार मानले.