Breaking News

पोलिसांच्या हद्द वादातून मृतदेहाची विटंबना


कर्जत (प्रतिनिधी):- जलालपूर येथील भीमा नदीच्या तीरावर सापडलेल्या एका व्यक्तीच्या प्रेताची पोलिसांच्या हद्द वादातून विटंबना झाली असून नदीच्या अलीकडे कर्जत तालुका तर पलीकडे श्रीगोंदा तालुका त्यामुळे या बॉडीवर शासकीय काम कोणी करायचे हा वाद आज पहावयास मिळाला. त्यामुळे कर्ता पुरुष जाऊन ही नातेवाईक मात्र या यंत्रणेपुढे हतबल झाले होते . दुःख बाजूला करून पोलिसांच्या मागे पाळण्याचे काम त्यांना करावे लागले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जलालपूर येथे एका इसमाचे प्रेत भीमानदीच्या तीरावर असल्याचे लोकांच्या लक्षात आले . त्यानंतर नागरिकांनी व नातेवाईकानी ते प्रेत बाहेर काढले. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील सुनिल बाबासाहेब काशीद ( वय ३२ ) हा युवक भिमा नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेला होता. मात्र त्याचा शोध न लागल्याने त्याचे नातेवाईक शोधाशोध घेत होते . त्यांना जलालपूर येथे भीमानदीत एक प्रेत असल्याचे समजले . त्यांनी येथे येऊन नागरिकाच्या मदतीने हे प्रेत बाहेर काढून खडकावर ठेवले यानंतर या प्रेताचा पंचनामा होऊन ते पोस्टमार्टम ला पाठवणे आवश्यक असल्याने याबाबत ची माहिती कर्जत तालुक्यातील राशीन पोलीस चौकीला देण्यात आली.मात्र येथील पोलिसाने आपण श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कळवा व ते तिकडे न्या इकडे आणले तर आपल्याला उशीर होईल रात्र होईल असे म्हणून आपली जबाबदारी झटकून मोकळे झाले, यामुळे संबंधित नातेवाईकांना काय करावे हे कळेना.कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच प्रेत नेले व नंतर पोलीस मागे लागले तर काय हा मोठा प्रश्न होताच ,मात्र कर्जत तालुक्यातील पोलीस न आल्याने अनेक तास हे प्रेत तसेच पडून होते त्यामुळे यावर काय करावे असा मोठा प्रश्न नागरिकांसह नातेवाईकाना पडला होता. हे प्रेत कर्जत तालुक्यातील जलालपूर च्या तीरावर ठेवले असल्यामुळे श्रीगोंदा पोलीस ही कारवाई करणे शक्य नव्हते .या प्रकरणात पोलिसांनी दाखविलेल्या अनास्थेमुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून याठिकाणी शेकडो लोक जमा झाले होते.

राशीन येथे पोलीस चौकी असुन येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणुन वैभव महांगरे याची नियुक्ती आहे.तरी देखील पोलीसांची कर्तव्य बजावताना कायम अनास्था दिसुन येते महांगरे याच्या कार्यक्षात कायम घटना घडत असतात. पोलीस माञ कर्तव्यात कसुर करताना दिसतात.