Breaking News

पिंपरी पोलिसांकडून नऊ सराईत आरोपींना अटक

पुणे, दि. 02, जून - मागील काही दिवसांपासून शहरात मोबाईल चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, सोने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याबाबत पिंपरी पोलिसांनी कारवाई करत नऊ सराईत आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून 14 लाख 7 हजार 725 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. सात कारवायांमध्ये 15 गुन्हे उघड झाल्याने शहरातील गुन्हेगारांवर पोलिसी खाक्याचा वचक निर्माण झाला आहे. सुरजितसिंग टाक, हर्षल पवार, महेश दिक्से, सॅम्युअल उर्फ विशाल ऑरनॉल्ड, अतुल पवार, सागर इंद्रा, राहुल काळे, अक्षय कोळेकर, शुभम काळभोर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.