Breaking News

बैलगाडीवर शेतकरी कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध

पुणे, दि. 02, जून - आज पासून शेतकरी संपला सुरुवात झाली आहे.त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिला आहे.आज पुणे बंगलोर हायवे वरील खेड शिवापूर टोल नाक्यावर शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले.
खेड शिवापूर टोल नाक्यावर कार्यकर्त्यांनी काही वेळ रस्ता रोखून धरला. आजपासून राज्यभर व देशभर किसान क्रांती जनआंदोलन देशभरात सुरुवात होणार आहे.राज्यातले शेतकरी आजपासून 10 जून पर्यंत संप सुरू ठेवणार आहेत..सरसकट संपूर्ण कर्जमाफी,दुधाला हमीभाव हा कमीतकमी 50 रुपये देण्याचा कायदा करावा,शेतीमालास उत्पादन खर्च अधिक 50 टक्के हमीभाव आधारित कायद्याने बाजारभवाची हमी मिळावी अशा विविध मागण्यांसाठी सुमारे 22 राज्यातील शेतकरी संपावर जाणार आहेत.यावेळी शेतकरी रस्त्यावर उतरणार नाही.तर शेतकरी आपला शेतीमाल शेतातून शहरात आणणार नाही.राज्यातील मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक या शहरात भाजीपाला व दुध आणू दिले जाणार नाही.हा शेतकर्‍यांचा देशव्यापी संप आहे.या संपासाठी किसान क्रांती जनआंदोलन, राष्ट्रीय किसान महासंघ, किसान एकता मंच यांच्यासह देशातील 100 हुन अधिक संघटना घेणार संपात सहभाग होणार आहेत.