Breaking News

जैविक इंधनाच्या उत्पादनाला प्रोत्साहन - नितिन गडकरी

पुणे, दि. 02, जून - पेट्रोल आणि डिझेल दरवाढी वर सरकार दीर्घकालीन उपाय शोधत आहे. यावर उपाय म्हणून जैविक इंधनावर चलाणार्‍या गाड्या च्या निर्मितिला प्राधान्य दिल जात आहे. तसंच जैविक इंधनाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं रस्ते वाहतूक, महामार्ग विकास आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं. केंद्र सरक ारची 4 वर्ष याबाबत त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. 

ते पुढे म्हणाले जैविक इंधन हे किफ़ायतशिर, सामान्य नागरिकांना परवडेल तसंच पर्यावरण पूरक आहे.
भाजप निवडून आल की मतदान यंत्रात गोंधळ होतो आणि काँग्रेस निवडून आल्यावर मतदान यंत्रात बिगाड़ होत नाही, अस ते म्हणाले. भाजपने घटने मध्ये बदल केला म्हणून टीका केली जात आहे पण काँग्रेस ने 72 वेळा घटनेमध्ये बदल केला आहे अस गडकरी म्हणाले. महिला आरक्षणवार सर्व पक्षीय चर्चा सूरु आहे अस त्यानी सांगितलं. जातीयवादी आणि साम्प्रदायिकतेच्या नावाने सध्या राजकरण सूरु असल्याचं ते म्हणाले.