Breaking News

4 जी स्पीडमध्ये रिलायन्स जिओ सर्वात शेवटच्या स्थानावर : ट्राय

मुंबई, दि. 21 - खर्‍याखुर्‍या 4 जी स्पीडसाठी तुम्ही रिलायन्स जिओचे सिम कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. कारण ट्रायच्या वेबसाईटवर मंगळवारी प्रसिद्ध झालेल्याने माहितीने जिओचे पितळ उघडे पाडले आहे.
एअरटेल, व्होडाफोन, आयडीया, अनिल अंबानींचे रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्या नेटवर्कचा स्पीड जिओ 4 जी पेक्षा खूपच अधिक असल्याचे यात म्हणले आहे. या वेबसाईटवर दिलेल्या माहिती नुसार एअरटेलच्या इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक म्हणजे 11.7 चइझड नोंदवला गेला. तर दुसर्‍या क्रमांकावर अनिल अंबानींचे रिलायन्स कम्युनिकेशन आहे.
तुम्हाला तुमच्या जुन्याच नंबरवर रिलायन्स 4 जी सेवेचा वापर करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर रिलायन्स जिओमध्ये पोर्ट करावा लागेल. यासाठी तुमच्या मेसेज बॉक्समध्ये झजठढ असे लिहून त्यापुढे तुमचा मोबाईल नंबर लिहावा, आणि हा मेसेज 1900 या नंबरवर पाठवावा. जिओच्या तंत्रज्ञांनी मात्र ट्रायच्या चाचणीचे निकाल मानायला नकार दिला आहे. या चाचणीचे इतर नेटवर्कच्या तुलनेत प्रसिद्ध करण्यात आलेले निकाल पूर्वग्रह दूषित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, 31 डिसेंबरपर्यंत मोफत कॉलिंगची घोषणा करणार्‍या जिओला इथंही ट्रायने चाप लावला आहे. त्यामुळे जिओला केवळ 3 डिसेंबरपर्यंत मोफत कॉलिंग सेवा देता येईल असा आदेश ट्रायने दिला आहे. इतर स्पर्धक कंपन्यांनी रिलायन्स ट्रायच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याची तक्रार ट्रायकडे केली होती.