Breaking News

एटीएमद्वारे तीन राज्यांतील २१ जणांची फसवणूक


राजस्थानसह पंजाब व हरियाणातील दोन डझन शहरात एटीएम बदलून लोकांची दहा ते बारा लाखांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीस मोबाइल लाेकेशनच्या आधारावरून पकडण्यात आले. आरोपीने यू़-ट्यूबवर व्हिडिओ पाहून एटीएम कार्ड बदलून रुपये काढण्याची कला अवगत केली. यानंतर फक्त सात महिन्यांत तीन राज्यांतील २१ हून अधिक लाेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले. आरोपीला पकडण्यासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून चुरू पोलिस त्याच्या मागावर हाेते. त्याला श्रीगंगानगर जिल्ह्यातील सादुल शहरात अटक करण्यात आली. पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात त्याने अनेक प्रकरणांची कबुली दिली आहे. त्याच्या टोळीतील अन्य सदस्यांची धरपकड सुरू झाली आहे.