Breaking News

तीन तलाकविराेधी विधेयक मंजुरीची प्रतीक्षा


संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू हाेत असून ते १८ अाॅगस्टपर्यंत चालेल. या काळात दाेन्ही सभागृहाचे सुमारे १८ दिवस कामकाज चालेल. या अधिवेशनात राज्यसभेत प्रलंबित असलेले तीन तलाकविराेधी विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. तसेच इतर मागासवर्गीय अायाेगाला घटनात्मक दर्जा देण्याबाबतचे विधेयकही मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
सांसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी साेमवारी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या सांसदीय समितीने अधिवेशनांच्या तारखांबाबत शिफारस केली अाहे. अाता राष्ट्रपती रामनाथ काेविंद अाैपचारिकपणे या काळात अधिवेशन हाेणार असल्याची घाेषणा करतील. पावसाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील.