Breaking News

पार्टीत दोन पोलिसांचा नशेत गोळीबार


मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिल्ली पोलिस दलातील दोन पोलिसांनी दारूच्या नशेत गोळीबार केला. या वेळी त्यांचेच पाय लटपटल्याने गोळी समोर उभ्या असलेल्या मित्राच्या डोक्यात शिरली. तो जागीच ठार झाला. दुर्घटनेनंतर दोन्ही हवालदार पळून गेले. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील भडेंटा गावातील आहे. दिल्लीच्या रोहिणी भागात दूध डेअरी चालवणारा सुंदर मोठ्या भावाच्या मेहुण्याच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत आला होता. त्याच्यासोबत दिल्ली पोलिस दलातील दोन हवालदार अनिल चौधरी व राजू पालीवाल हे दोघेही आलेले होते. शनिवारी रात्री वाढदिवसाचा केक कापत असताना हवालदार अनिल याने हवेत गोळीबार सुरू केला.