Breaking News

सिरियातील 'व्हाइट हेल्मेट्स'ला अमेरिकेने केले आर्थिक साह्य


दमास्कस सिरिया सरकारने 'व्हाइट हेल्मेट्स' या सैन्य समूहाला दहशतवादी समूह म्हणून घोषित केले होते. स्थानिक सना वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, अमेरिकेने 'व्हाइट हेल्मेट्स' समूहाला अतिरिक्त वित्तसाह्य दिले आहे. अमेरिकी नेतृत्वाखाली पाश्चात्त्य देश सिरियामध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी २०११ पासून समर्थन देत आहेत. यासाठी व्हाइट हेल्मेट्स गटाची मदत घेतली जात आहे. सिरियामध्ये दहशतवाद वाढवण्यात या गटाचा मोठा हात आहे.