‘अमृतवाहिनी’च्या विद्यार्थ्यांना थेट नोकर्या : शिंदे
संगमनेर प्रतिनिधी
उत्कृष्ट निकाल व गुणवत्ता ही परंपरा जोपासतांना अमृतवाहिनीत परिपूर्ण विद्यार्थी घडविले जातात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी असलेल्या सततच्या संलग्नतेमुळे अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये थेट नोकर्यांची संधी मिळत आहे, असे गौरवौद्गार मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी काढले.
अमृतवाहिनी पॉलिटेक्निकमध्ये उद्योजक विकास शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. बी. धुमाळ होते. व्यासपीठावर डॉ. एम. ए. व्यंकटेश, केशवराव जाधव, रजिष्ट्रार प्रा. विजय वाघे, प्रा. जी. बी. काळे, समन्वयक प्रा. बी. जी. कुटे, प्रा. बी. आर. कुलकर्णी, मिलिंद इंगोले, शेखर सूर्वे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले, सध्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या मनात करिअरबाबत संभ्रम निर्माण होत आहे. परंतू आजही उच्च गुणवत्तेच्या माणसांची कमतरता आहे. अमृतवाहिनी संस्थेत आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. यावेळी प्राचार्य व्ही. बी. धुमाळ यांनी मार्गदर्शन केले. प्रा. जी. बी. काळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रा. निलिमा चौधरी यांनी आभार मानले.
