स्वागताने चिमुकल्यांचे चेहरे खुलले!
प्रवरानगर प्रतिनिधी
शाळेच्या पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या गणवेशातील मुलां-मुलींच्या शाळेत जाण्याच्या लगबगीची वेगळीच धांदल उडाली होती. काहीसहा बावरलेल्या पण, बालवयातून शालेय जीवनात प्रवेश करणाऱ्या चिमुकल्यांचे शाळेमध्ये गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणखी द्विगुणीत झाल्याचे दिसत होते.
प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये संचालक कर्नल डॉ. भरतकुमार, प्राचार्य सयराम शेळके, समन्वयक के. टी अडसूळ, सुपरवायझर एम. एस. जगधने, प्राथमिक विभागाचे इन्चार्ज एस. आर. क्षिरसागर, क्रीडा संचालक गोरक्ष दळे, मिनी जोसेफ, किसान अडसूळ, सय्यद अजीज, गोविंदा तांबे, प्रदीप कुमार वाजपेयी, प्रशांत भावसार आदींनी नवोदितांचे स्वागत केले. प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्राचार्य संगिता देवकर, शिक्षिका रेखा रत्नपारखी, शुभांगी रत्नपारखी, क्रीडा संचालक राहुल काळे आदी शिक्षिकांनी तर, प्रवरा कन्याविद्यामंदिरमध्ये प्राचार्य लीलावती सरोदे, क्रीडा संचालिका विद्या गाढे -घोरपडे, प्राथमिक विभागाच्या प्राचार्या जयश्री भोंडे, प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये प्राचार्या स्वाती लोखंडे, सचिन लांजेवार, एम. जी. निमसे, ए. एस. बोधक, आर. बी. भणगे, आर. डी शिंदे, संगीता दरंदले, क्रिडा संचालक राजेंद्र तांबे, अहिल्याबाई होळकर विद्यालयामध्ये प्राचार्य निवृत्ती एनगे आदींनी चिमुकल्यांचे स्वागत केली. प्रारंभी संजय देशमुख, क्रीडासंचालक भाऊसाहेब बेंद्रे यांनी प्रास्ताविक केले.
